प्रख्यात व्यावसायिक संतोष कदम यांना कोल्हापूर उद्योजक सन्मान पुरस्कार

कोल्हापूरमध्ये मराठी सिनेअभिनेत्री अक्षता देवधर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रख्यात व्यावसायिक संतोष कदम यांना स्वीट एन लिफ्ट या मिडिया क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेच्या वतीने कोहापुर उद्योजक सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापुरातील दी फर्न एन इकॉस्टिक हॉटेल मध्ये प्रख्यात मराठी सिनेअभिनेत्री अक्षता देवधर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

स्वीट एन लिफ्ट ही मीडिया जगतातील अग्रगण्य असलेली संस्था असून राज्यातील विविध ग्रामीण भागातील होतकरू उद्योजकांना, त्याच्या उद्योगाला यश मिळावे त्याचबरोबर त्यांच्या उद्योगाची प्रसिध्दी व्हावी तसेच त्याचा फायदा नवउद्योजकांना व्हावा यासाठी संस्थेच्या वतीने उद्योग सन्मान पुरस्कार देवुन गौरविले जाते. आजपर्यंत या संस्थेकडून राज्यातील विविध भागात असे अठरा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गातील प्रख्यात व्यावसायिक संतोष कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खरतर पुरस्कार हे निमित्त असतात पण यातून अधिक उमेदीने समाजपयोगी काम करण्याची ऊर्जा मिळते. पुरस्कारासाठी समस्त कोल्हापूरवासिय आणि स्विफ्ट एन लिफ्ट संस्थेचे श्री. कदम यांनी आभार मानले आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील अनेक नामवंत उद्योजक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!