महायुतीच्या प्रचाराचा मालवणात शुभारंभ ; भाजपा, शिवसेना, मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांना मालवण शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार

मालवण : महायुतीचे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप, शिवसेना, मनसे आदी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोमवारी मालवण शहरात करण्यात आला. देऊळवाडा श्री देव रामेश्वर मंदिर, श्री नारायण मंदिर तसेच परिसरातील देवालंय येथे श्रीफळ ठेवून ना. राणे यांच्या विजयाचे साकडे घालण्यात आले. तसेच भरड दत्त मंदिर येथेही श्रीफळ ठेवून मालवण शहर बाजारपेठ येथे प्रचाराला सुरवात करण्यात आली.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, हरीश गांवकर, महेश सारंग, आप्पा लुडबे, राजन वराडकर, अशोक तोडणकर, आबा हडकर, केपी चव्हाण, सूर्यकांत फणसेकर, प्रमोद करलकर, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गांवकर, किसान मांजरेकर, ऋत्विक सामंत, सोशल मीडिया हर्षल पारकर, सोनाली पाटकर, मनसे पदाधिकारी गणेश वाईरकर, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, मनसे माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, सागर जाधव, गुरु तोडणकर, महिला प्रांतिक सदस्य रश्मी लुडबे, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, शहर अध्यक्ष चारू आचरेकर, पुजा वेरलकर, तारका चव्हाण, महानंदा खानोलकर, ममता वराडकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, महिमा मयेकर, स्वाती हडकर, तुलसी चव्हाण, सुनंदा विर, भाग्यश्री ढोलम यांसह नाना साईल, पंकज पेडणेकर, परशुराम पाटकर, राजेंद्र लुडबे, विलास मुणगेकर, मोहन वराडकर, किशोर खानोलकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, अमोल केळुसकर, राजु बिडये, अभय कदम, निषय पालेकर, निलम पांजरी, विनायक रेडकर, साहिल माशेलकर, कुणाल खानोलकर, वसंत गांवकर, कमलाकर कोचरेकर, संदिप मालंडकर, दादा कोचरेकर, बाबू कासवकर, मुन्ना फाटक, नंदू देसाई, हेमंत तोडणकर, विद्या मेस्त्री यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!