मालवण भाजपा महिला आघाडीकडून केक कापून ना. राणेंचा वाढदिवस साजरा
मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ७२ वा वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी बुधवारी पार पडला. यानिमित्त मालवण तालुका भाजपाच्या महिला आघाडीने केक कापून राणे साहेबांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी महिला आघाडी तालुकाध्यक्षा पूजा करलकर, शहरअध्यक्षा अन्वेषा आचरेकर, शहर सरचिटणीस महिमा मयेकर, ओबीसी सेल अध्यक्षा पूजा वेरलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, शर्वरी पाटकर, महानंदा खानोलकर तसेच कु. तुलसी चव्हाण, कु. खुशी मयेकर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.