भूषण साटम यांना मातृशोक
मालवण : येथील श्रीमती उषा शिवाजी साटम (वय ८५, रा. वायरी भूतनाथ वराडकरवाडी ता. मालवण) यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्याघरी निधन झाले.
मालवण येथील जुन्या काळातील रंगभूमीकार आणि नाट्यकार कै. सदाशिव गोपाळ मुणगेकर यांची ती मुलगी तर मालवण येथील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक भूषण साटम यांची आई होय. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या मृतदेहावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.