शिवराज्यभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त मालवणमध्ये रंगणाऱ्या महानाट्याला मनसेचे सर्वतोपरी सहकार्य 

मालवण : सकल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून मालवण शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी ६ जुन रोजी महानाट्य सादर करण्याची योजना आखली आहे. शहरातील गणेश मेस्त्री आणि भाऊ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या महानाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या महानाट्यात जवळपास १५०  कलाकार सहभागी होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे राजा शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचे महानाट्य पहिल्यांदाच शहरात सादर होत आहे.

या स्तुत्य अशा कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना  सहकार्य करणार आहे. आगामी काळात होणाऱ्या या महानाट्याच्या तयारीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, महाराष्ट्र सैनिक सागर जाधव, जगदीश तोडणकर, बंटी कांबळी, गुरु तोडणकर, मळगावचे शाखा अध्यक्ष हर्षद परब यांनी मामा वरेरकर नाट्यगृह येथे भेट दिली. यावेळी पक्षाच्या वतीने भाऊ सामंत, गणेश मेस्त्री आणि सहकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी या महानाट्य कार्यक्रमाला सर्वोतोपरी मदत देखील करणार असल्याचे उपजिल्हाअध्यक्ष गणेश वाईरकर यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!