थकबाकी वसुलीसाठी मालवणात नगरपालिका प्रशासन आक्रमक ; दोन थकीत नळजोडण्या तोडल्या
मालवण : मालवण नगरपालिकेने थकबाकी वसुलीसाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज धडक पाणीपट्टी वसुली मोहीम राबवित दोन थकीत नळजोडणी तोडण्याची कारवाई करण्यात आली.
यात शहरातील तसेच कुंभारमाठ ग्रामपंचायत हद्दीतील २ थकीत नळजोडणी धारकांना पाणीपट्टी वसुली पथक सोनाली हळदणकर, महेश परब, श्री. पाटकर, भास्कर राऊळ, सुनीलकुमार कदम, सुभाष कुमठेकर, सागर नरे, सतीश सरमळकर, पांडुरंग तळवडेकर, श्री. डिचवलकर यांच्यामार्फत जप्तीची नोटीस बजावण्यात आल्या तसेच शहरातील अन्य २ थकीत नळजोडणी तोडण्याची कारवाई करण्यात आली. यापुढेही थकीत पाणीपट्टी धारकांवर, मालवण पालिका पाणीपुरवठा विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.