महाविकास आघाडीचा कुडाळात निषेध मोर्चा ; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराचा निषेध

कुणाल मांजरेकर

उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कुडाळात निषेध मोर्चा काढला. यावेळी केंद्रातील मोदी व उत्तरप्रदेश राज्यातील योगी सरकारचा निषेध करतानाच केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.

उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सिंधुदुर्ग बंदची हाक दिली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कुडाळ मधील व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी कुडाळ येथील शिवसेना शाखेसमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शने केली. त्यानंतर शिवसेना शाखा ते तहसीलदार कार्यालय असा निषेध मोर्चा काढून तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. केंद्र व उत्तरप्रदेश सरकार विरोधात घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला. केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष भास्कर परब, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. जान्हवी सावंत, तालुका संघटक सौ.स्नेहा दळवी, जि.प.सदस्या वर्षा कुडाळकर, उपसभापती जयभारत पालव, विकास कुडाळकर, संतोष शिरसाट, अतुल बंगे, रूपेश पावसकर, विजय प्रभू, मंदार शिरसाट, सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, सौ.श्रेया गवंडे, सुशील चिंदरकर, संजय भोगटे, संदीप म्हाडेश्वर, राजू गवंडे, बाळा कोरगांवकर, बाळा पावसकर, नितीन सावंत, दीपक आंगणे, गंगाराम सडवेलकर, अमित राणे, किरण शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जर मोदी सरकार सातत्याने शेतकरी विरोधी धोरण राबवित असेल तर शेतक-यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. भविष्यात महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी केंद्र सरकारला देण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!