“आरटीओ” कार्यालयाच्यावतीने कुणकेश्वर यात्रेत रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती

सिंधुदुर्ग : महाशिवरात्री निमित्त होत असलेल्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर यात्रेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने रस्ता सुरक्षा या विषयावर प्रबोधन करण्यासाठी सुरक्षा चित्ररथ डिजिटल व अलाउन्सिंगद्वारे उभे करून यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच रस्ता सुरक्षा विषयक माहिती दर्शक पुस्तके व पत्रके वाटण्यात आली.

यावेळी रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोटर वाहन निरीक्षक रत्नाकांत ढोबळे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अरुण पाटील, अमित पाटील, धनंजय हिले, सिद्धार्थ ओवाळ, वाहन चालक, संजय केळकर, वैभव राणे, रूपेश कुडाळकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!