मुख्यमंत्री सडक अंतर्गत सोनवडे मुख्य रस्त्याचे निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते व्हर्च्युअल पद्धतीने जिल्हा नियोजन सभागृहातून भूमिपूजन
कुडाळ- मालवण मतदार संघात ६५७ कोटींच्या कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील एकूण ६५७ कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृह सिंधुदुर्गनगरी ओरोस यथून संपन्न झाला. या सोहळ्यासाठी भाजपा नेते निलेश राणे हे सोनवडे येथून व्हर्च्युअल पध्द्तीने उपस्थित होते.
सोनवडे येथे सोनवडे मुख्य रस्त्यासाठी एकूण ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यात दोन ब्रिज, ७ नवीन मोऱ्या, ८० मीटर लांबीची संरक्षक भिंत यासाहित एकूण ४ किलोमीटर लांबीचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कनिष्ट अभियंता श्री. कोचरेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, युवा मोर्चा अध्यक्ष निखिल कांदळगावकर, माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर, पंचायत समिती सदस्य बाळू मडव, आनंद शिरवलकर, नारायण गावडे, कुपवडे सरपंच दिलीप तवटे, सोनवडे सरपंच प्रतीक्षा घाडी, घोटगे सरपंच चैताली घाडीगांवकर, जांभवडे सरपंच अमित मडव, भरणी सरपंच अश्विनी मेस्त्री, योगेश परब, चेतन ढवळ, जनार्दन गुरव, शरद गुरव, संतोष घाडी, सचिन तेली आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.