… अखेर निलेश राणेंच्या माध्यमातून स्वखर्चाने “त्या” रस्स्याची तात्पुरती दुरुस्ती
ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर ; ग्रामस्थांनी मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील आडारी बेळणे रस्ता ते मठ भोगलेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. हा रस्ता तातडीने सुरळीत करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार भाजपाचे कुडाळ मालवण विधामसभा प्रमुख निलेश राणे यांनी स्वखर्चाने तात्पुरत्या स्वरूपात या रस्त्याचे काम करून हा रस्ता सुरू केला आहे.
सदर रस्त्यासाठी अनेक वर्ष ग्रामस्थांची मागणी होती या रस्त्यामुळे मठ भोगलेवाडीतील ग्रामस्थांना शॉर्टकट जाता येणार आहे. रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थानी समाधान व्यक्त करत निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. सदस्य संतोष पालव, कांता भोगले, मोहन भोगले, विलास भोगले, धनेश भोगले, अजित भोगले, रोशन भोगले, राजू भोगले, बाबू भोगले, चंद्रकांत भोगले, पप्पू भोगले, बाबुराव भोगले, तातू भोगले, दीपक राणे, सुरेश राणे, रॉबी फर्नांडीस, संजय सनम, निलेश खोत यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.