भाजपा नेते निलेश राणेंची वचनपूर्ती ; आचरा खारभूमी योजनेसाठी ९२ लाखांचा निधी मंजूर

१७ मे २०२३ रोजी निलेश राणे यांनी पाहणी करून निधी उपलब्ध करून देण्याची दिली होती ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील आचरा येथे खारबंधारा फुटल्याने शेतजमिनीत पाणी घुसून जमिन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी १७ मे २०२३ रोजी आचरा खारबंधाऱ्यांची पहाणी करून तत्काळ दुरुस्तीच्या सूचना खारभूमी अभियंता श्री. होडावडेकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करत तात्पुरती उपाययोजना श्री. होडावडेकर यांनी केली होती. मात्र याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी आचरा ग्रामस्थांकडून निलेश राणे यांच्याजवळ करण्यात आली होती, त्यानुसार याबाबतची निविदा जाहीर झाली असून एकूण ९२ लाख एवढा निधी आचरा खारभूमी येथे खर्ची होणार आहे. निलेश राणे यांनी आचरा खारभूमी संदर्भात आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल आचरा ग्रामस्थ तसेच भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर व आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!