साळकुंभा येथे उद्या शिवजयंती उत्सव

मालवण : मालवण तालुक्यातील साळकुंभा गावडेवाडी येथे सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी अमित बाळकृष्ण गावडे यांच्या निवासस्थानी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सकाळी ९ वाजता छ. शिवाजी यांच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची पूजा, सायंकाळी ५ पासून तिर्थप्रसाद व महाप्रसाद सायंकाळी ६ वाजता त्रिंबक येथील स्वरसंदेश कार्यक्रम,रात्री ८ वाजता श्री गांगेश्वर प्रसादिक भजन मंडळ रामगड यांचे वारकरी भजन तरी आपण सर्वांनी छ.शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अमित बाळकृष्ण गावडे तसेच समस्त गावडे कुटुंबीय यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!