आचरा तिठा येथे १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा
शिवसेना आचरा विभाग आणि सिंह गर्जना ग्रुप आचरा यांच्या वतीने आयोजन
मालवण : शिवसेना आचरा विभाग आणि सिंहगर्जना ग्रुप आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा तिठा येथे सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दिवसभर शिवकाळाची अनुभूती देणारे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकणभूमीत शिवजयंती हा दिवस सणासारखा साजरा करावा, या उद्देशाने “उत्सव माझ्या राजाचा” हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. यात सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्थानिक मुलांचा पोवाडा गायन कार्यक्रम, सायंकाळी ४ वाजता शिवचरित्रावर आधारीत पथनाट्य, ४.३० वाजता १८ वर्षाखालील मुलांसाठी मालवण तालुका मर्यादित शिवचरित्रावर आधारीत वेशभुषा व अभिनय स्पर्धा घेतली जाणार असून आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यात प्रथम नवनोंदणी करणाऱ्या १५ स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे.
सायंकाळी ५ वाजता तलवार बाजी, मल्लखांब असे मर्दानी खेळ, ५.३० वाजता आचरा पंचक्रोशीतील सर्पमित्रांचा सत्कार तसेच आमदार वैभव नाईक आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा शिवसेना आचरा विभागाच्या वतीने जाहीर सत्कार, ७.३० वाजता वारकरी दिंडी भजन, आचरा पारवाडी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आकर्षक देखावा हा मुख्य आकर्षण असणार आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी मुन्ना परब ९४२११४४३७६ किंवा माणिक राणे ९४२१२३७८१० तरी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा शिवप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना आचरा विभाग व सिंहगर्जना ग्रुप आचरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.