जीजींना वाढता पाठींबा ; मनविसे मालवण तालुका शाखा अध्यक्ष कार्यकर्त्यांसह उपरकरांसमवेत
१८ फेब्रुवारी रोजी कुडाळमध्ये होणाऱ्या मेळाव्यात मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी होणार : वैभव आजगांवकर
मालवण | कुणाल मांजरेकर
माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांना मालवण तालुक्यातून वाढता पाठींबा मिळताना दिसत आहे. मनविसेचे मालवण तालुका शाखाध्यक्ष वैभव आजगांवकर यांनी जीजी उपरकर यांना पाठींबा जाहीर केला आहे.
माजी आमदार जीजी उपरकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मालवण मधून त्यांना वाढता पाठींबा मिळत आहे. मनविसेचे मालवण शाखाध्यक्ष वैभव आजगांवकर यांनी कार्यकर्त्यांसह उपरकर यांना पाठींबा जाहीर केला आहे. सर्जेकोट कोळंब माजी उपविभाग अध्यक्ष विशाल निकम, तुषार परब, ऋषभ आजगावकर, वैभव करवडकर, प्रकाश करवडकर, अर्जुन आरोलकर, हर्षद कुर्ले, किशोर जामसंडेकर, भावेश खडपकर, गोविंद सावजी, निहाल आडकर यांसह अन्य कार्यकर्त्यांनी देखील उपरकर यांना पाठींबा जाहीर केला आहे.
कुडाळ येथे १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेळाव्यातुन उपरकर पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत. या मेळाव्यातही मालवण तालुक्यातून मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती वैभव आजगावकर यांनी दिली.