खारेपाटण येथे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राचे उद्घघाटन

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती ; खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा उपक्रम

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण यांच्यावतीने माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर व केंद्रसरकारच्या औषध प्रशासन विभाग पुरस्कृत प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्राचे उद्घघाटन मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्याहस्ते खारेपाटण येथे फीत कापून करण्यात आले. 

खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाील संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, सौ. प्रज्ञा ढवण, समीर सावंत, खारेपाटण सोसायटीचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार, जिल्हा सह.संस्था उपनिबंधक माणिक सांगळे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधीक्षक सौ यादव मॅडम, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कणकवलीचे कृष्णकांत धुळप, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण व्यापारी असो.चे अध्यक्ष प्राजल कुबल, खारेपाटण सोसायटी व्हाइस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर, संचालक विजय देसाई, इस्माईल मुकादम, श्रीधर गुरव, संतोष सरफरे, अशोक पाटील, तृप्ती माळवदे, उज्ज्वला चिके, मंगेश गुरव, रघुनाथ राणे,मोहन पगारे,रवींद्र शेट्ये,संदेश धुमाळे,संस्थेचे सचिव कृष्णा कर्ले,खारेपाटण व्यापारी असो.चे अध्यक्ष प्राजल कुबल,खारेपाटण प्रा.आ.केंद्र वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रिया वडाम,कणकवली तालुका केमिस्ट असो.चे संचालक शेखर राणे, सिं.जि.बँक खारेपाटण शाखेच्या मॅनेजर श्रीम.चव्हाण, श्री रफिक नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खारेपाटण सोसायटीच्या वतीने प्रमुख पाहुणे व उद्घघाटक जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी यांचा विशेष सत्कार संस्थाअध्यक्ष रवींद्र जठार यांच्याहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी मनीष दळवी म्हणाले, खारेपाटण सोसायटी ही कोकणातील पहिली विकास संस्था आहे. जीने केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन गोरगरीब जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र सुरू केले आहे.यामुळे खारेपाटण सोसायटीचे नाव केद्रात उमटणार आहे. जिल्हा बँकेचा पायाच मुळात विकास संस्था आहे. त्यामुळे खारेपाटण सोसायटीला नेहमीच जिल्हा बँक मदत करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी धुळप, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन रवींद्र जठार यांनी केले. सूत्रसंचालन सूर्यकांत भालेकर यांनी केले तर संचालक विजय देसाई यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद व शेतकरी नागरिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!