भाजपाची फायर ब्रँड तोफ, माजी खा. निलेश राणेंना एस्कॉर्टसह वाय दर्जाची सुरक्षा

सोमवारपासून माजी खा. राणेंच्या ताफ्यात सुरक्षा व्यवस्था तैनात

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय जनता पार्टीची फायर ब्रँड तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार तथा कुडाळ मालवणचे विधानसभा प्रमुख निलेश राणे यांना राज्य शासनाने एस्कॉर्ट सह वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे. उद्यापासून ( सोमवार) ही सुरक्षा पुरवली जाणार आहे.

माजी खासदार निलेश राणे हे भारतीय जनता पार्टीचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असणारे त्यांचे दौरे लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यांना सुरक्षा व्यवस्था बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!