खरं तर शिवसेना सदस्यांचा प्रवेश कालच घेणार होतो, पण…

भाजप नेते, माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेनेला ट्विटर वरून डिवचले

कुणाल मांजरेकर

मालवण : कुडाळ पंचायत समितीमधील शिवसेनेच्या ३ सदस्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला ट्विटर वरून डिवचले आहे.

“मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर जाऊन २४ तास होत नाही की शिवसेनेचे ३ विद्यमान पंचायत समिती सदस्य यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खरं तर हा प्रवेश आम्ही काल घेणार होतो पण मुख्यमंत्र्याची काही तर ठेवली पाहिजे म्हणून आज प्रवेश झाला” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!