विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत ओरोसला ९ फेब्रुवारी रोजी जनता दरबार
मालवण तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आवाहन
मालवण, ता. ७ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ओरोस येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे जनता दरबार घेणार आहेत. या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
जनता दरबाराच्या निमित्ताने श्री. दानवे हे प्रशासकीय तक्रारी जाणून घेणार आहेत. तरी तालुक्यातील उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख, युवासेना तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथप्रमुख, महीला उपजिल्हा संघटक, तालुका समन्वयक, शहर संघटक, उपशहर संघटक, विभाग संघटक, उपविभाग संघटक, शाखा संघटक, उपशाखा संघटक, बुथसंघटक, युवतीसेना तालुका संघटक, उपतालुका संघटक, शहर संघटक, उपशहर संघटक, विभाग संघटक, उपविभाग संघटक, शहर संघटक, शाखासंघटक, उपशाखा संघटक, बूथसंघटक यांनी आपल्या परिसरातील नागरिकांच्या असलेल्या तक्रारींचे निवारण करून घेण्यासाठी संबंधित नागरिक ग्रामस्थांसह उपस्थित राहावे असे आवाहनही श्री. खोबरेकर यांनी केले आहे.