आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुढे यावेत

निलेश राणे ; नमो चषक ॲथलेटिक्स व टेबल टेनिस स्पर्धेचे मालवणात उद्धघाटन

मालवण : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुढे आले पाहिजेत. शालेय जीवनात विविध क्रीडा स्पर्धात सहभागी होऊन विद्यार्थी खेळाडू यांनी तयारी करावी. येथील खेळाडू, प्रशिक्षक यांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच सोबत राहू. सिंधुदुर्गची ओळख सर्वच खेळातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचू दे. असे प्रतिपादन भाजपा नेते, कुडाळ- मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी केले.

दरम्यान, टेबलटेनिस क्रीडा प्रकारात जेष्ठ परीक्षक विष्णू कोरगावकर यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारे खेळाडू त्यांनी मालवण, सिंधुदुर्ग येथून तयार केले.  खेळाडू घडवत असताना आपल्याला लागेल ते सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. असेही निलेश राणे यांनी सांगत कोरगावकर यांच्या कार्याचा गौरव केला. 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सिंधुदुर्ग आयोजीत नमो चषक ॲथलेटिक्स टेबल टेनिस स्पर्धेचा उद्धघाटन सोहळा भाजपा नेते, कुडाळ- मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या हस्ते जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवण येथे बुधवारी संपन्न झाले. यावेळी निलेश राणे टेबलटेनिस खेळात सहभागी झाले. खेळाची आवड असून आपण एक खेळाडूच असल्याचे सांगत सर्व खेळाडूंना निलेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, पंकज सादये, खरेदी विक्री संचालक आबा हडकर, टेबलटेनिस जेष्ठ परीक्षक विष्णू कोरगावकर, प्रमोद करलकर, युवामोर्चा उपाध्यक्ष राकेश सावंत, मालवण शहरअध्यक्ष ललित चव्हाण, स्पर्धा संयोजक मयु पारकार, सागर वालावलकर, ताराचंद पाटकर, राम बांदेलकर, युवामोर्चा तालुका सरचिटणीस निषय पालेकर, निनाद बादेकर, राजा मांजरेकर, शुभम लुडबे, सुरज भगत, पंकज गावडे, अरविंद सावंत, अमोल केळूसकर, अखिलेश शिंदे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थी स्पर्धक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पर्धेस लाभला.

यावेळी विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर यांनी विचार मांडताना सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या संकल्पनेतून युवा वर्गाला स्पर्धा व्यासपीठ मिळण्यासाठी नमो चषक आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारातून एक दर्जात्मक व स्पर्धात्मक व्यासपीठ खेळाडूंना उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. 

नमो चषक ॲथलेटिक्स स्पर्धा उदघाटन निलेश राणे यांच्या उपस्थितीत आबा हडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी करून संपूर्ण स्पर्धेची माहिती सविस्तरपणे सांगितली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!