युवा पिढीने एकत्र राहून गावचा आणि समाजाचा विकास करावा !

सौरभ ताम्हणकर यांचे प्रतिपादन ; तारकर्ली येथील हॉलीबॉल प्रीमिअर लीगचे उदघाटन

मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे माघी गणेशोत्सवा निमित्त श्री महापुरुष कला क्रीडा प्रतिष्ठान यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या तारकर्ली हॉलिबॉल प्रीमियर लीगचे उदघाट्न भारतीय जनता युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौरभ ताम्हणकर यांनी श्री महापुरुष कला क्रीडा प्रतिष्ठान आणि स्वामी बॉईज यांचे कौतुक केले. युवा पिढीने असेच एकत्रित राहून आपल्या गावाचा व आपल्या समाजाचा विकास करूया, असे ते म्हणाले. 

ही स्पर्धा तीन दिवस प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत तरुणांसोबत वयस्कर व्यक्तींचा देखील लक्षणीय सहभाग आहे. यावेळी विनायक परुळेकर, घनश्याम कुबल, आशुतोष तुळसकर, चंद्रशेखर केळुसकर, प्रतीक कुबल, गोरक्ष पराडकर, अनिल टिकम, कुणाल बापर्डेकर, गणपत मोंडकर, दिलेश कोळंबकर, सर्वेश कुबल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!