सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ फेब्रुवारी पर्यंत मनाई आदेश जारी ; जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आदेश 

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समाजाचा आरक्षण मु‌द्दा, आगामी साजरे होणारे उत्पात निमिताने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम, सोशल मिडीयावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह पोस्ट, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी या करिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशोर तावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयाचे संपूर्ण भूभागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि 37(3) प्रमाणे दिनांक 28/01/2024 रोजी 00.01 वाजलेपासून, ते दिनांक 11/02/2024 रोजी 24.00 वा. पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.

राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाचे मु‌द्द्‌यावरून आक्रमक होत आहेत. त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष वाढीसाठी सभा, मेळावे व शिबिराचे आयोजन करण्यात येत असून पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांवर टीकाटिप्पणी करीत असतात. सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह पोस्ट व व्हीडीओ प्रसारित करून विविध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्याचे पडसाद जिल्हयात उमटत आहेत.

दिनांक 07/02/2024 रोजी शब-ए-मेराज (बड़ी रात) साजरी करण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक व सामाईक मागणीकरिता उपोषणे मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी राज्यात उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून 28/01/2024 रोजी 00.01 वाजलेपासून, ते दिनांक 11/02/2024 रोजी 24.00 वा. पर्यंत मनाई आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हयाचे संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करीत आहे.

अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठया किंवा शारीरीक इजा करण्यांसाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे,

ब) अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्पोटक पदार्थ घेवून फिरणे,

क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.

3) व्यक्तींची किंवा प्रेते किंया आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)

इ) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजचौणे.

फ) सभ्यता अगर निली याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सांग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांल प्रसार करणे.

अ) सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये पाच अगर पाचाहून आादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूक्त काढणे व सभा घेणे.

आ) हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तु हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे झागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी, संबधीत विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही.

वरील कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यांस परवानगी देण्यांचे अधिकार पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करीत तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!