उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत रस्ता सुरक्षा जनजागृती बाबत मार्गदर्शन

जिल्ह्यात १५ जानेवारी ते १६ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान

सिंधुदुर्ग : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने १५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत रस्त्यावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने  Walk on Right, Helmet/seat belt वापरणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, वाहतुकीची चिन्हे, lane discipline, Good Samaritan याविषयी सोमवार जनजागृती करण्यात आली.

मोटर वाहन कायदा १९८८ कलम १२९ व १९४ ड मधील हेल्मेट वापरा संबंधीच्या व रस्त्यावर वाहन चालवताना रस्ता सुरक्षा वापरासंबंधीच्या आदेश देणारी चिन्हे व सावधानतेची व माहिती दर्शवणारी चिन्हे याबाबत यावेळी माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात एनसीसीचे ५८ महाराष्ट्र बटालियनचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅडेट्स उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मोटर वाहन निरीक्षक मनोज लोणार, सहायक मोटर वाहन निरीक्षक अरुण पाटील, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रीतम पवार तसेच एनसीसी सिंधुदुर्ग प्रतिनिधी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!