भुलाथापा मारू नका, हिंमत असेल तर आ. वैभव नाईकांच्या विरोधात पुरावे सादर करा ..

ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांना आव्हान

मालवण | कुणाल मांजरेकर

आमदार वैभव नाईक यांनी चिंदर, त्रिंबक, वायंगणी हिर्लेवाडी, आचरा डोंगरेवाडी गावातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात अर्थकारण केल्याचा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी करत हे अर्थकारण पुराव्यानिशी उघड करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत श्री. चिंदरकर यांनी तोंडातून हवेचे बुडबुडे काढण्यापेक्षा हिंमत असेल तर हे पुरावे सादर करावेच, अन्यथा जनतेची दिशाभूल करायचे प्रकार बंद करावेत, असे आव्हान ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिले आहे. 

आमदार वैभव नाईक यांच्याकडे वारसा हक्काने आलेल्या संपत्तीची ईडी, एसीबी मार्फत चौकशी करण्यात आली. ते सुद्धा आ. नाईक यांच्या विरोधात पुरावे आणू शकले नाहीत. मुळात आ. नाईक यांच्याकडे पिढीजात संपत्ती असून हे हिशोब त्यांनी तपास यंत्रणांना सादर केले आहेत. मात्र जनते मध्ये गैरसमज पसरवण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष चुकीची वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी वायफळ बडबड करू नये, असे हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!