पाणबुडी प्रकल्पावर बोलण्यापेक्षा ९ वर्षात कुडाळ – मालवण मतदार संघात कोणते प्रकल्प आणले ते सांगा !

भाजपा नेते निलेश राणे यांचा आ. वैभव नाईकांना सवाल ; गुजरात मध्ये प्रकल्प झाला म्हणजे इथे होणार नाही, म्हणणे चुकीचे

संजय राऊत यांनी पाणबुडीवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कुवतीनुसार पान टपरी, पानपट्टी पर्यंतच रहावे

मालवण | कुणाल मांजरेकर

वेंगुर्ला तालुक्यात प्रस्तावित असलेला पाणबुडी प्रकल्प गुजरात मध्ये गेल्यावरून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक ओरडत आहेत. मुळात पाणबुडी म्हणजे सबमरीन प्रकल्प आहे. तो किनारपट्टी असलेल्या कोणत्याही राज्यात होऊ शकतो. आणि एखाद्या ठिकाणी झाला म्हणजे दुसऱ्या ठिकाणी होणार नाही, म्हणणे चुकीचे आहे. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प होणारच आहे. मात्र वेंगुर्ला मतदार संघातील प्रकल्पावर बोलण्यापुर्वी आ. नाईक यांनी स्वतःच्या कुडाळ मालवण मतदार संघात ९ वर्षात किती प्रकल्प आणले, ते जाहीर करावेत, असे आव्हान भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी दिले आहे. खा. संजय राऊत यांची पात्रता पान पट्टी, पान टपरी इथपर्यंतच मर्यादित आहे, त्यांनी पाणबुडी सारख्या विषयावर बोलू नये, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

याबाबत निलेश राणे यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओत म्ह्टले आहे की, पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राचा महाराष्ट्रात आहे, गुजरातचा गुजरात मध्ये होणार. पाणबुडी प्रकल्प म्हणजे सबमारिन प्रकल्प जिथे जिथे किनारा आहे तिथे होऊ शकतो. पाणबुडी प्रकल्प जो वेंगुर्ला मध्ये 2017 या वर्षी मंजूर झाला होता. काही लोकांना शंका वाटते तो गुजरातला गेला की काय? पाणबुडी प्रकल्प म्हणजे सबमारिन प्रकल्प जिथे जिथे किनारा आहे तिथे होऊ शकतो. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक अन्य किनारपट्टी राज्यात होऊ शकतो. मात्र महाराष्ट्र मधला रद्द झाला आणि गुजरातला गेला हे खोटे आहे. गुजरातने गुजरातचा केला असेल. मात्र आपल्या राज्याचा आपला राज्यातच होणार आहे.

या प्रकल्पाबाबत भाष्य करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांना विचारायचे आहे, हा प्रकल्प वेंगुर्ला येथे होणार आहे. म्हणजे तुमच्या मतदारसंघा बाहेर होतोय. तो वेंगुर्ला या ठिकाणी आहे तसा प्रस्तावित होणारच. मात्र ९ वर्षात तुमच्या मतदार संघात कोणते प्रकल्प आणले हे जनतेला सांगा. असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनीही या प्रकल्पावर टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणबुडी या विषयावर बोलू नये पानटपरी, पानपट्टी हेच विषय तुझ्यासाठी मर्यादित आहेत. असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!