कट्टा, पोईप, वडाचापाट, नांदोस गावातील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने
आ. नाईक यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द मार्गी ; ग्रामस्थांनी मानले आभार
मालवण : मालवण तालुक्यातील कट्टा, पोईप, वडाचापाट, नांदोस गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली. संबंधित गावातील ग्रामस्थांना विकास कामे मार्गी लावण्याचा दिलेला शब्द आ. वैभव नाईक यांनी पूर्ण केला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
यामध्ये बजेट २०२०-२१ अंतर्गत नांदोस जोडरस्ता ( कट्टा समादेवी मंदिर ते नांदोस ग्रामपंचायत कार्यालय) ग्रा.मा ३३८ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ९.५० लाख, कट्टा एसटी स्टॅण्ड ते गुरामवाड जाणारा रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे १९ लाख, नांदोस खोत दुकान ते बांधवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ६ लाख, पोईप खालची पालववाडी ते कुपवरे वाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख या कामांची भूमिपूजने तसेच पोईप मुंजेश्वर मंदिर जाणारा रस्ता निधी ५ लाख या कामाचे उदघाटन करण्यात आले.
त्याचबरोबर जि.प.शाळा वडाचापाट इमारत दुरुस्त करणे रक्कम २ लाख रु, वडाचापाट थळकरवाडी ग्रा.मा. १९९ खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख रु.,वडाचापाट हायस्कूल ते चाफेखोल ग्रा.मा. ३९३ खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख रु.,वडाचापाट शांतादुर्गा मंदिर ते पालव मांगर मार्ग ग्रा.मा. १९७ खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख रु.,जि. प. शाळा वडाचापाट ते रवळनाथ मंदिर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख या कामांची उदघाटने करण्यात आली
मसदे गुरामवाड कट्टा रस्ता ते वामन पाटकर घर जाणारा रस्ता ५ लाख, मसदे गुरामवाड कट्टा रस्ता ते वडाचापाट बौध्दवाडी मार्गे लीला काप रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, नेरुरकर फॅक्टरी येथे कॉजवे बांधणे २५ लाख, जलजीवन मिशन अंतर्गत पाटकरवाडी, थळकरवाडी, कुळकरवाडी, नौपाटवाडी, ब्राम्हणवाडी येथे नळपाणी योजना निधी ७० लाख या कामांची भूमिपूजने करण्यात आली.
यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कुडाळ मालवण विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभुगावकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, महिला तालुका प्रमुख श्वेता सावंत, विभागप्रमुख कमलाकर गावडे, विभाग प्रमुख विजय पालव, भाऊ चव्हाण, सन्मेष परब,पंकज वर्दम,अशोक नांदोसकर, हेमंत माळकर, भिकाजी गावडे, राजू गावडे,बबन गावडे, अरुण गावडे,नाना पालव, सुशील पालव, छोटू पालव,गिरीष पालव, विठ्ठल नाईक, राजा पालव,नाना नेरुरकर,कृष्णा पाटकर,सुरेश नेरुरकर,वामन पाटकर, दिलीप पालव, हर्षद मोरजकर,प्रसाद रेवडेकर,देवदास रेवडेकर,यशवंत भोजने, आकेरकर सर, दर्शन म्हाडगूत, वंदेश ढोलम आदींसह त्या त्या गावातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.