जिल्हा नियोजनच्या माध्यमातून कुडाळ, मालवणसाठी २०.२३ कोटींचा निधी

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यासाठी २० कोटी २३ लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कुडाळ व मालवण तालुक्यातील अनेक विकासकामांचा प्रश्न मार्गी लागला आहे, अशी माहिती निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश घाडी यांनी दिली आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन-२०२३/२४ अंतर्गत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर निधी पुढीलप्रमाणे – इतर जिल्हा मार्ग- १ कोटी ७० लाख, क वर्ग पर्यटन- ६९ लाख, ग्रामीण मार्ग देखभाल दुरुस्ती- ३ कोटी २२ लाख, जनसुविधा- ४ कोटी ९९ लाख, नगरोत्थान- ३ कोटी ८२ लाख, नागरी सुविधा- १ कोटी २८ लाख, जिल्हा वार्षिक पर्यटन योजना- २ कोटी ७६ लाख, बंधारे- ४५ लाख, शाळा दुरुस्ती- ५० लाख, शाळा बांधकाम- ६ लाख, साकव देखभाल दुरुस्ती- १ कोटी ५५ लाख, व्यायामशाळा- ७ लाख,  MSEB- ५९ लाख असा एकूण- २० कोटी २३ लाख निधी मंजूर झाला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!