मालवण आगारातून आजपासून विजापूर बससेवा सुरु

आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांची माहिती

मालवण : मालवण एसटी आगारातून सोमवार दि. ११ डिसेंबर पासून विजापूर मार्गावर बस सेवा सुरु होत आहे. सकाळी ९.१५ वा. मालवण विजापूर ही बसफेरी फोंडा अथनी मार्गे निघणार आहे. तसेच विजापूर येथून दुपारी ११.३० वा. विजापूर मालवण ही बसफेरी नियमित असणार आहे. अशी माहिती मालवण आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी देत प्रवाशांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!