माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वाढदिवसानिमित्त अक्कलकोट, पंढरपूरसह धार्मिक स्थळांचे दर्शन ; पालकमंत्री ना. चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा 

मालवण : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा ६० वा वाढदिवस शनिवारी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीवरून त्यांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सावंत यांनी आपली आई, पत्नी अमृता सावंत यासह नातेवाईक, मित्र पारिवारासमवेत अक्कलकोट, पंढरपूर, कोल्हापूरची अंबाबाई, ज्योतिबा याठिकाणी देवदर्शन केले. 

वाढदिवसानिमित्त श्री. सावंत यांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्याठिकाणी सावंत यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, नारायण लुडबे, बाळा भोगले, रवी टेंबुलकर, मोहन कुबल, अक्षय कदम, संदेश वस्त यासह अन्य उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!