राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह मान्यवर नेत्यांची ना. राणेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौदल दिनानिमित्त मालवणात दाखल झालेल्या महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर नेत्यांनी सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण मधील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ना. राणे यांनी सर्वांचे स्वागत केले.
यामध्ये राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदींचा समावेश होता.