राजकोट मधील शिवस्मारकामुळे पर्यटन वाढी बरोबरच पर्यटन पूरक व्यवसायांना चालना मिळणार
भाजपा नेते निलेश राणे यांचा विश्वास ; राणेंकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत
मालवण | कुणाल मांजरेकर
भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक मालवण दौरा संपन्न झाला. यावेळी भाजपचे नेते निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, राजकोट मधील शिवस्मारकामुळे पर्यटन वाढी बरोबरच पर्यटन पूरक व्यवसायांना चालना देखील प्रवेश मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे आगमन झाल्यानंतर भाजपा मालवण कुडाळ विधनासभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, उपाध्यक्ष अतुल काळसेकर व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आज नौदल दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान सन्मा. श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभहस्ते मराठा आरमाराच्या निर्मितीने ज्यांनी भारतीय नौदलाची मुहूर्तमेढ रोवली ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट किल्ल्यावरील प्रतिमेचा अनावरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा ठरणाऱ्या या शिवस्मारकामुळे जिल्ह्यातील पर्यटनवाढीसोबतच पर्यटनपूरक नवीन व्यवसायांना देखील चालना मिळणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री श्री. नारायणराव राणे साहेब, केंद्रीय मंत्री श्री. राजनाथजी सिंग, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण उपस्थित होते” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.