भरणी गावातील जलजीवन मिशन योजनेचे निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमीपूजन
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील भरणी गावासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या जलजीवन अंतर्गत नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मानेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर नल या योजनेच्या अंतर्गत भरणी गावासाठी ८१ लाख एवढा निधी मंजूर झाला होता त्यानंतर पुन्हा पुन्हा सुधारात्मक जोडणीसाठी तरतूद करण्यात आली असून या योजनेअंतर्गत गावातील सर्व घरांसाठी नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. या भूमिपूजन प्रसंगी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा कार्यकारणी सदस्य विनायक राणे, नित्यानंद कांदळगावकर, माजी जि. प. अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळू मडव, विभाग प्रमुख दिलीप तवटे, नारायण गावडे सचिन तेली, चेतन धवळ, चैताली ढवळ, प्रतीक्षा घाडी, संदीप मेस्त्री, सुशील तांबे, सुधीर धुरी, नागेश परब, विशाल मेस्त्री, बाळा राणे, अनिल परब, राजू परब आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.