मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मालवणात

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून मालवणातील कार्यक्रम स्थळाची ते पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवार दि. ३० नोव्हेबर रोजी दुपारी ३ वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने राजकोटकडे प्रयाण. दुपारी ३.३० वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारी पाहणी. सायंकाळी ४ वाजता मोटारीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. ४.३० वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारीबाबत बैठक. स्थळ:- चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग सायं. ५.१५ वाजता चिपी विमानतळ येथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!