आप्पा लुडबे यांच्यावतीने आयोजित शिबिराला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद ; तब्बल ३८०० जणांनी घेतला लाभ
वायरीत आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिर संपन्न
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे मालवण मधील माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यावतीने आयोजित आयुष्मान, आभा, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिरास रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला. दोन टप्प्यात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा तब्बल ३८०० नागरिकांनी लाभ घेतला आहे.
श्री. लुडबे यांनी नागरिकांसाठी पहिल्या टप्प्यात सात दिवस तर दुसऱ्या टप्यात पाच दिवस शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आयुष्मान कार्ड काढण्याचा १२०० नागरिकांनी, आभा कार्ड काढण्याचा १७०० नागरिकांनी, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीचा ९०० नागरिकांनी लाभ घेतला असल्याची माहिती श्री. लुडबे यांनी दिली. यावेळी संजय पाताडे, गोविंद गावकर, दीपक कुडाळकर, साक्षी जुवाटकर, बबलू लुडबे, अतुल हडकर, भाई लुडबे, संजय वराडकर हेमंत मिठबावकर, राजन गवंडी, यशवंत गावकर, प्रमोद मराळ, शिवराम मराळ, अरविंद मराळ, साक्षी पाटकर, पप्पू चव्हाण, सुहास चव्हाण, किशोर पाटकर, भुषण माडये, संजय वराडकर, बंटी चव्हाण, सुमित जाधव, बाबा शेख, शैलेश लुडबे, राजन आजगावकर, बाळू मेस्त्री आदींचे या शिबिरासाठी सहकार्य लाभले.