मालवण नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान म्हणून ४४.४२ लाखांचा निधी

खा. विनायक राऊत यांचा पाठपुरावा ; नगराध्यक्षांनी मानले आभार

कुणाल मांजरेकर

मालवण : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून मालवण नगरपालिकेला ४४ लाख ४२ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील १२ कामांना चालना मिळणार असून खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी उपलब्ध झाल्याची माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
नगराध्यक्षांनी आपल्या दालनात ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, मालवण नगरपालिकेने खासदार विनायक राऊत यांच्याकडे विविध विकासकामांसाठी निधी मिळण्याची लेखी मागणी केली होती. त्यानुसार खा. राऊत यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान म्हणून ४४ लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यामध्ये चिवला बीच धुरीवाडा मच्छीमार निवारा शेड नजीक हायमास्ट बसविणे, माघी गणेश चौक टोपीवाला हायस्कूल नजीक हायमास्ट बसवणे, आडारी गणपती मंदिर येथे विद्युतीकरण करणे, बागायत घर ते गारुडेश्वर येथील रस्त्यावर विद्युतीकरण करणे, रेवतळे आदर्श नगर येथे रस्त्यावर विद्युतीकरण करणे, बाळू कोळंबकर घर ते गवंडीवाडा येथील रस्त्यांवर विद्युतीकरण करणे, आडारी गणपती मंदिर परिसर विकसित करणे व बैठक व्यवस्था करणे, मेढा चर्च येथे मिनी हायमास्ट बसवणे, वायरी केळबाई मंदिर येथे मिनी हायमास्ट बसवणे, वायरी गावकरवाडा शिंदीया देवालय येथे मिनी हायमास्ट बसवणे, चर्मकार वसाहत येथे मिनी हायमास्ट बसवणे, भरड दत्त मंदिर येथे मिनी हायमास्ट बसवणे आदी कामांचा समावेश आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!