मालवण शहराला भाजपकडून विकास कामांचा “बूस्टर डोस” ; तब्बल १.६२ कोटींच्या कामांचा शुभारंभ

भाजपा नेते निलेश राणेंची उपस्थिती ; शहरातील १४ विकास कामांचा समावेश

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्यातील शिवसेना – भाजपा सरकारच्या माध्यमातून मालवण नगरपरिषदेस विकास कामांचा बूस्टर डोस मिळाला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहराला १ कोटी ६२ लाखांचा विशेष निधी प्राप्त झाला असून या निधीतील १४ विकास कामांचे भूमिपूजन माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी करण्यात आले.

यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, मच्छिमार सेल जिल्हा संयोजक विकी तोरसकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, अशोक तोडणकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, सुहास हडकर, किसानमोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहरअध्यक्ष ललित चव्हाण, माजी नगरसेविका पूजा सरकारे, चारुशीला आचरेकर, राणी पराडकर, महिमा मयेकर, प्रमोद करलकर, तारका चव्हाण, संचालक आबा हडकर, राजू बिडये, पंकज पेडणेकर, युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर, कॅलिस फर्नांडीस, राजा मांजरेकर, संजीव गणपत बिडये, दिनेश साळसकर, दत्तात्रय केळुसकर, सचिन हडकर, हरी केळुसकर, प्रसाद भोजने, पंकज पेडणेकर, विनीत मंडलीक, सुरज भगत, शुभम लुडबे, निनाद बादेकर, राज कांदळकर, तन्वी चव्हाण, कमलाकर खोत, अनिल मुणगेकर, सुशांत शेलटकर, राजेश हुले, लुईस फर्नांडीस, अमित खरात, बाबुषा डिसोझा, परेश वाघ, संघर्ष, दाजी मोरजे, दादा कोचरेकर, नारायण गांवकर, विशाल नागवेकर, उमेश हडीकर, सिद्धेश, नरेश कोयंडे, ईशा गांवकर, कमलाकांत चव्हाण, बाबू चव्हाण, लिया रॉडरींग्ज, जेम्स रोड्रीग्ज, बंटी फर्नांडीस, आंतोंन कलसेकर, मंगेश कोयंडे, भाई बटाव, दिनेश, भावेश, विष्णू मालंडकर, लुडबे तसेच अन्य पदाधिकारी यासह पिंपळपार व भरड, तारकर्ली नाका येथील रिक्षा व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.

भूमिपूजन करण्यात आलेल्या १४ रस्ता डांबरीकरण व अन्य विकासकामांपैकी मेढा रासम गल्ली, मेढा मुरलीधर मंदिर ते रोझरी चर्च रस्ता, फोवकांडा पिंपळ नगरपरिषद पर्यटन केंद्र समोरील रस्ता, इंदिरा कॉम्पलेक्स ते नगरपरिषद रस्ता, भरड नाका ते हडकर मार्ग रस्ता डांबरीकरण, भरड ते तारकर्ली मार्गावरील नगरपरिषद हद्दीतील रस्ता, रांगोळी महाराज मठ ते लिलाव सेंटरकडे जाणारा रस्ता, गवंडीवाडा कल्पतरू रस्ता ते मच्छिमार्केट जाणारा रस्ता, वायरी तारकर्ली-गवंडीवाडा या रस्त्यावरील उर्वरित कर्विंग ते डांबरीकरण, दांडी मोरेश्वर रांज ते मोरेश्वर स्मशानभूमी रस्ता, वायरी शिवनेरी चौक गर्देरोड रस्ता, आडारी घनकचरा केंद्र ते मालवणकर घरापर्यंत रस्ता, धुरीवाडा साईमंदिर रोड ते पडवळ घर ते काजरोबा मंदिर कन्याशाळा पर्यंतचा रस्ता डांबरीकरण व गटार मजबूतीकरण, आदर्श नगर ते कोलगे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण या कामांचे भूमिपूजन प्रतिनिधिक स्वरूपात माजी खासदार निलेश राणे यांसह, दत्तात्रय केळूसकर, विलास मुणगेकर, सुहास हडकर, पूजा करलकर, चारुशीला आचरेकर, भरड तारकर्ली नाका येथील रिक्षा व्यावसायिक तसेच संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. मंजूर रस्ते विकास कामांबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, भाजपा नेते निलेश राणे यांनी शहरातील विकास कामांच्या भूमिपूजन दौऱ्या दरम्यान भरड दत्त मंदिर आणि वायरी येथील मारुती मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!