VIDEO : शिवसेना – महाविकास आघाडीचे उमेदवार मंगेश टेमकर आणि सहकाऱ्यांचे आचऱ्यात मोठे शक्तीप्रदर्शन !

आजची गर्दी उद्याच्या विजयाची नांदी ; शिवसेनेच्या (ठाकरे गट) नारायण कुबल यांचा विश्वास

महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित ; विजयानंतर जनसेवक म्हणूनच काम करणार : मंगेश टेमकर यांची ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढू लागली आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश उर्फ जीजा टेमकर आणि सदस्य पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी बाजारपेठेतून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आजची गर्दी हीच उद्याच्या महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी ठरेल, असा विश्वास शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी नारायण कुबल यांनी व्यक्त केला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत असून श्री देव रामेश्वराच्या आशीर्वादाने आमचे सर्व उमेदवार विजयी होतील, विजयानंतर आमचे उमेदवार जनसेवक म्हणून काम करतील, अशी ग्वाही मंगेश टेमकर यांनी दिली आहे.

मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ५ नोव्हेंबर रोजी होत आहे. ही निवडणूक भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर आणि सहकाऱ्यांनी बाजारपेठेत प्रचार फेरीच्या माध्यमातून मोठे शक्तीप्रदर्शन केले.

श्री देव रामेश्वराच्या आशीर्वादाने आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर व सर्व १३ सदस्य उमेदवार यांना प्रचार दरम्यान जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे ठाकरे गट पदाधिकारी नारायण कुबल यांनी सांगितले. या निवडणुकीच्या निमित्ताने आचरा गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे लक्ष राहणार आहे. आगामी काळात रोजगार निर्मिती व स्वयंरोजगार याला प्राधान्य दिले जाणार आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आचरा गावात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून या माध्यमातून आचरा गावात विकासाला प्राधान्य दिले जात आहे. मंगेश टेमकर आणि त्यांची कन्या प्रणया टेमकर यांनी सरपंच पदाच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असून १ कोटी ६५ लाख रुपये खर्चून सुसज्ज मच्छीमार्केट उभारण्यात आले आहे. आचरा वासियांना अपेक्षित असलेले विकास धोरण, रोजगार निश्चितच ते पूर्ण करतील. गाव विकासाचे संकल्प, नव्या विकास योजना सतत यामागे राहून गावविकासाचा ध्यास असलेले मंगेश टेमकर यांना जनतेचे मिळत असलेले आशीर्वाद प्रतिसाद हा विजयच आहे, असे नारायण कुबल यांनी सांगितले.

सरपंच उमेदवार मंगेश टेमकर म्हणाले, जनतेतून मिळणारा प्रतिसाद हाच आमच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. जनतेला जे अपेक्षित आहे ते पूर्ण करणे, गावातील सर्व वाडी वस्तीतील अधिकाधिक विकास कामाना प्राधान्य देणे हेच आमचे धोरण राहील. जनतेचे सेवक म्हणूनच आम्ही काम करू. आमचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमताने विजय होतील असा विश्वास मंगेश टेमकर व सर्व सदस्य उमेदवार यांनी प्रचारदरम्यान व्यक्त केला आहे.

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांसह सदस्य उमेदवार म्ह्णून प्रिया मेस्त्री, पूर्वा तारी, चंद्रशेखर मुणगेकर, अनुष्का गावकर, सुकन्या वाडेकर, सचिन बागवे, श्रद्धा सक्रू, अनिकेत मांजरेकर, युगंधरा मोरजे, सदानंद घाडी, चंदन पांगे, अमृता गांवकर, माणिक राणे आदी निवडणूक रिंगणात आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!