आचरा ग्रा. पं. निवडणूक : सरपंच पदासाठी भाजपच्या जेरॉन फर्नांडिस यांचा उमेदवारी अर्ज दाखल
भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
मालवण | कुणाल मांजरेकर
आचरा ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या ५ नोव्हेंबर रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यासह खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, संतोष कोदे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, संतोष गावकर, ज्ञानदेव पाटील, शेखर मोर्वेकर, विजय कदम, मनोज हडकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, राजू बिडये, बाबली चोपडेकर, संदीप मालंडकर यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.