आचरा ग्रामपंचायतीवर भगवा फडकवणार ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला विश्वास

देवबाग, तारकर्ली प्रमाणे आचरा गावाच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही

भाजपाकडे उमेदवार नसल्याने सरपंच पदासाठी जि. प. चा लोकप्रतिनिधी राहिलेल्या व्यक्तीला उमेदवारी

मालवण (कुणाल मांजरेकर) राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही भाजपवर आचरा गावात जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी राहिलेल्या उमेदवाराला सरपंच पदाची उमेदवारी देण्याची वेळ आल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी लगावला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकदिलाने आणि एक विचाराने कार्यरत आहेत. त्यामुळे आचरा ग्रामपंचायत निवडणूकीत श्री देव रामेश्वर कृपेने सर्वांच्या साथीने सरपंच पदाचे उमेदवार मंगेश (जिजा) टेमकर यांसह सर्व सदस्य उमेदवार विजयी होऊन आचरा ग्रामपंचायतीवर भगवा फडकेल, असा विश्वास हरी खोबरेकर व उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

आचरा येथील लौकिक सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर खोबरेकर व पदाधिकारी यांनी संवाद साधला. यावेळी विनायक परब, बाबी जोगी, माजी सरपंच प्रणया टेमकर, दिलिप कावले, नारायण कुबल, मनोहर वाडेकर, शाम घाडी, विभागप्रमुख समिर लब्दे, पपू परुळेकर, नितीन घाडी, परेश तारी, संजय परब, महेंद्र परब, गणेश परब, मिताली कोरगावकर, सेजल आचरेकर, प्रसाद टोपले, सुंदर आचरेकर, प्रवीण मुणगेकर, बाबा मालवणकर यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार

यावेळी ठाकरे गटाकडून पाच प्रभागासाठी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवारी दाखल केलेल्यांची माहिती देण्यात आली. प्रभाग १ : प्रिया मेस्त्री, चंद्रशेखर मुणगेकर, पूर्वा तारी प्रभाग २ : सुकन्या वाडेकर, अनुष्का गांवकर, सचिन बागवे प्रभाग ३ : श्रद्धा सक्रू, अनिकेत मांजरेकर / सचिन परब प्रभाग ४ : सदानंद घाडी, युगंधरा मोरजे प्रभाग ५ : चंदन पांगे, अमृता गांवकर, माणिक राणे यांची नावे जाहीर केली आहेत.

यावेळी बोलताना हरी खोबरेकर म्हणाले, सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून मंगेश टेमकर यांना सरपंच पदासाठी उमेदवारी दिली आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर व सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत भगवा नक्की फडकेल. सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खोबरेकर यांनी व्यक्त केला.

सर्वत्र महागाई, वाढलेली बेरोजगारी, शैक्षणिक दुरावस्था असताना पंतप्रधान मोदींचा कोणता चेहरा घेऊन भाजपा लोकांपर्यंत जाणार ? असा सवाल करून कोणतेही विकासात्मक काम भाजपा करु शकले नाहीत. आम्ही देवबाग, तारकर्ली प्रमाणे आचरा गावाच्या पर्यटन विकासासाठीही प्रयत्नशील असल्याचे हरी खोबरेकर यांनी सांगितले.

सर्वांच्या पाठिंब्यावर विजय निश्चित : मंगेश टेमकर

यावेळी सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर म्हणाले, गेली पंधरा वर्षे सरपंच, सदस्य म्हणून काम करत असताना आपण लोकांच्या गरजा ओळखून काम केले. आपण केलेली विकासकामे लोकांच्या नजरेसमोर आहेत. यापुढेही येथील जनतेला अपेक्षित विकास साध्य करणे यालाच आपले प्राधान्य राहील. सर्वांच्या पाठिंब्यावर आम्हा सर्वांचा विजय होईल असा विश्वास मंगेश टेमकर यांनी व्यक्त केला.

राज्यात आणि देशात परिवर्तनाची वाटचाल सुरु आहे. आचरा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्व उमेदवार यांचा विजय निश्चित आहे. सरपंच उमेदवार मंगेश टेमकर यांच्यात विकासाचे व्हिजन व विकासनिधी आणण्याचे स्किल आहे. सोबत एकदिलाने काम सुरु आहे. एकसंघपणे काम करताना पूर्वीची शिवसेना असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता लढायचे ते जिंकण्यासाठी असे विनायक परब म्हणाले. तर मागील पाच वर्ष कालावधीत मंगेश टेमकर यांच्या मार्गदर्शनखाली गाव विकासासाठी अनेक कामे एकजुटीतून झाली. कुठल्याही योजनेतील निधी शिल्लक राहिला, कामे झाली नाहीत असे कोणी सांगितले नाही. अन्य विकासकामे, नवी विकास कामेहही पुढील काळात पूर्ण करणार. असा विश्वास अनुष्का गावकर यांनी व्यक्त केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!