मालवण : धुरीवाड्यात उद्या महिला आणि मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा ; आकर्षक बक्षीसांचा वर्षाव
नवरात्रौत्सवा निमित्ताने सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने आयोजन ; रविवारी महिलांसाठी “खेळ पैठणीचा” कार्यक्रम
मालवण | कुणाल मांजरेकर
युवती सेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने धुरीवाडा येथे महिला गरबाचा कार्यक्रम सुरु आहे. याचे औचित्य साधून शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता महिला आणि मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे रविवारी २२ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार असल्याची माहिती सौ. शिल्पा खोत यांनी दिली आहे.
मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या, शिवसेना ठाकरे गटाच्या युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या धुरीवाडा येथे यतीन खोत यांच्या निवासस्थानानजिक नवरात्री निमित्त नऊ दिवस विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यावर्षीचे हे दहावे वर्ष आहे. शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता महिला आणि लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. लहान मुलांसाठी ३ ते ५ वर्षे, ६ ते १० वर्षे आणि ११ वर्षांपासून पुढे खुला गट असे तीन गट ठेवण्यात आले असून महिलांच्या वेषभूषा स्पर्धा खुल्या गटात होतील. तर रविवारी २२ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी सौ शिल्पा खोत 9422584641, 8390103330, तन्वी भगत 9172490833 किंवा दिया पवार +918010257932 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.