मालवणाचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी चरणी भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांचे “सेवाकार्य” !

महाप्रसादासाठी आवश्यक ४०० ताटे दिली भेट ; माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पुढाकार

निलेश राणे आमदार होण्यासाठी दत्ता सामंत, दीपक पाटकर यांचे आई सातेरी चरणी “साकडे

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहराचे ग्रामदैवत असलेल्या देऊळवाडा येथील श्री सातेरी मंदिरात होणाऱ्या महाप्रसादासाठी आवश्यक असणारी ४०० ताटे भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी गुरुवारी मंदिराच्या मानकरी, गावकर यांच्याकडे सुपूर्द केली. भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी यासाठी पाठपुरावा केला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते निलेश राणे आमदार होण्यासाठी दत्ता सामंत, दीपक पाटकर यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी देवीला साकडे घातले. निलेश राणे आमदार झाल्यानंतर त्यांना मंदिरात आणून देवीची यथोचित सेवा केली जाईल, असे साकडे यावेळी घालण्यात आहे

नवरात्र उत्सवासह अन्य धार्मिक विधींवेळी मंदिरात भाविकांसाठी महाप्रसाद असतो. यावेळी महाप्रसादासाठी येथे ताटे (डिश) उपलब्ध होण्याची मागणी स्थानिकांमार्फत माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दत्ता सामंत यांच्याकडे केली होती. त्यानुसार दत्ता सामंत यांनी तात्काळ ४०० ताटे मंदिरास भेट देण्याचे मान्य केले. त्यानुसार गुरुवारी सकाळी सातेरी मंदिर येथे समस्त सातेरी मित्रमंडळ, घाडी परिवार, गावकर परिवार यांच्या उपस्थितीत ही ताटे भेट देण्यात आली. निलेश राणे बहुमताने आमदार होऊदेत असे साकडे यावेळी दत्ता सामंत, दीपक पाटकर यांच्या माध्यमातून देवी चरणी घालण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, संजय लुडबे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, कमलाकर कोचरेकर तसेच सातेरी मित्रमंडळ, घाडी परिवार, गावकर परिवार, स्थानिक नागरिक उपस्थित होते. मंदिराला आवश्यक असणारी ताटे उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित गावकर मंडळींनी आभार व्यक्त करीत भाजपाच्या उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!