खा. विनायक राऊत यांचा २१ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे सत्कार

शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल आ. वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन

मालवण : सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल जान्हवी सावंत यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळा भिसे, संग्राम प्रभुगावकर, युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी कुडाळ मालवण मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, व युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!