आडवली गावात दुग्धक्रांती घडवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार ; भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली भेट ; पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची राणेंची ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील आडवली गावात दुग्ध क्रांती घडवून आणण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे यांची मालवण येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी गावात दुग्ध क्रांती घडवून आणण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही निलेश राणे यांनी दिली आहे. दरम्यान, येथील शेतीसाठी नदीपात्रातुन पाणी उपसा करण्यासाठी जादा क्षमतेचा पंप अथवा लघु पाटबंधारे मार्फत उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करून जिल्हा नियोजन मधून निधी दिला जाईल, असे निलेश राणे यांनी सांगितले.

आडवली गावातील दुग्ध व्यवसाय आणि पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कुडाळ मालवण प्रभारी निलेश राणे यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, राजा गावडे आदी पदाधिकाऱ्यांसह बाळा राऊत, प्रशांत परब, भार्गव लाड, दूर्गाप्रसाद तुळपुळे, भगवान लाड, नारायण पांचाळ, विशाल लाड, सुरेंद्र लाड, प्रकाश राऊळ, संतोष लाड, सतीश लाड, प्रविण लाड, शैलेश लाड, दत्ताराम लाड, विजय लाड, दिलीप मालंडकर, संभाजी साटम, आनंद सुर्वे, अतुल राणे, प्रसाद लाड, गोपाळ लाड, स्वप्निल लाड, नंदकिशोर लाड, आनंद सुर्वे, आनंद लाड, अतुल राणे, संतोष लाड, विशाल लाड, कमलाकर साळकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी म्हैशी खरेदीसाठी जिल्हा बँक मार्फत अर्थसहाय्यक उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. तसेच दूध संकलन साठी गोकुळ माध्यमातून सहकार्य होण्याच्या दृष्टीने योग्य ती प्रक्रिया केली जाईल. शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे निलेश राणे यांनी सांगितले. दत्ता सामंत यांनीही शेतकरी वर्गाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!