भाजपा नेते निलेश राणेंकडून देवबाग पाठोपाठ झारापमध्येही ठाकरे गटाला धक्का !
ठाकरे गटाच्या सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्यांसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश
कुडाळ : भाजपचे कुडाळ, मालवण मतदार संघाचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी देवबाग पाठोपाठ कुडाळ तालुक्यातील झाराप मध्येही ठाकरे गटाला धक्का दिला आहे. झाराप ग्रामपंचायत सरपंच सौ. दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश परब, ग्रामपंचायत सदस्य अनंत मयेकर यांच्यासह ग्रामस्थांनी ठाकरे गट शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला. तुम्ही ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही निलेश राणे यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, चिटणीस विनायक राणे, माजी नगरसेवक पाटकर, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, माजी सभापती मोहन सावंत, माजी पंचायत समिती सदस्य स्वप्ना वारंग, पप्या तवटे, नगरसेवक अभी गावडे, रूपेश बिडये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश कानडे यांनी केले
यावेळी अमोल तेली, विद्या जाधव, भगवान परब, प्रगती घाडी, सुप्रिया मांजरेकर, सर्वेश मांजरेकर, संजय मांजरेकर, विश्राम घाडी, दशरथ मेस्त्री, हर्षदा मेस्त्री, विजया मेस्त्री, हनुमंत मेस्त्री, विलास मेस्त्री, उत्तम मेस्त्री, साक्षी तेली, जान्हवी गावकर, सविता ठाकूर, चैताली कुडाळकर, प्रीती तेली, अश्विनी तेली, माधवी मयेकर, नितीन पाटकर, ऋतिक मुंडये, दादा कलंगुटकर, निधी पाटकर, विठोबा गावकर, प्रमोद मेस्त्री, परेश हळदणकर, सुरेश शिरोडकर, सुधाकर मयेकर, महिमा हळदणकर, रत्नभागा मयेकर, महादेवी मयेकर, जतिन मयेकर, दत्ता आळवे, तुषार नारूरकर, रमजान भालेकर, शिल्पा माणगावकर, स्नेहल माणगावकर, सत्यवान माणगावकर, सुभाष माणगावकर, महेश गोडे, मनश्री शिरोडकर, भारती गवळी, सुलोचना घाडी, रुपावती घाडी, चैताली कुडाळकर, अश्विनी तेली, सुचित्रा सामंत, सुधीर हळदणकर, निलेश तुळसकर, प्रवीण रेडकर, अनामिका घाडीगांवकर, मधुकर शिरोडकर, गुरू गवळी यांनी प्रवेश केला.
यावेळी निलेश राणे म्हणाले, गावाचा विकास करायचा असेल तर भाजपला साथ देणे गरजेचे आहे. तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य आहे. आता तुम्हाला जे मिळवून द्यायचे आहे ते आम्ही देवू. आता गावाच्या विकासाची जबाबदारी आमची आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.