मालवणात बांधकाम कामगार नोंदणी, आधारकार्ड नोंदणी दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आ. वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक यतिन खोत यांच्यावतीने आयोजन

मालवण : आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पुढाकारातून धुरीवाडा येथे बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी व आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १३४ जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी करण्यात आली. कामगारांना शासन स्तरावर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच यावेळी आधारकार्ड नोंदणी तसेच आधारकार्ड दुरुस्ती अथवा अपडेट शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते.

माजी नगरसेवक यतीन खोत यांसह माजी नगरसेविका दर्शना कासवकर, युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख समन्वयक सौ. शिल्पा खोत, सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर यांच्या सहकार्यातून शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी नंदा सारंग, शांती तोंडवळकर, तन्वी भगत, शुभम बारामते, दिया पवार तसेच अनंत पाटकर यांचे सहकार्य लाभले. शिबीर आयोजन करून दिल्याबाबत आमदार वैभव नाईक यांचे यतीन व शिल्पा खोत यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!