आ. वैभव नाईक यांच्याकडून बांदिवडेतील मांजरेकर कुटुंबियांना आर्थिक मदत…

मालवण : मालवण तालुक्यातील बांदीवडे बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर अचानक कोसळून मोठे नुकसान झाले आहे. हे कुटुंब गरीब असून अचानक घराचे छप्पर कोसळल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत विचारपूस करून आर्थिक मदत केली व मांजरेकर कुटुंबियांना धीर दिला. मांजरेकर कुटूंबियांना सर्व शिवसैनिकांच्या वतीने देखील पैसे गोळा करून अधिकची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, मसुरे विभागप्रमुख पिंट्या गावकर, शाखाप्रमुख मधुकर परब , युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, सरपंच आशु मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडीगांवकर, राहुल सावंत, ग्रामपंचायत सदस्य नारायण परब, विनायक गावकर, सौ. गावकर, स्वप्नील मुणगेकर, चंद्रकांत परब, अनिल परब, रंजन प्रभु, माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, योगेश मेस्त्री, संजय राणे, अश्विनी बांदकर, आपा परब, बबलु मिठबावकर, मया हडकर, विकास आचरेकर, आयवाण फर्नांडिस आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3590

Leave a Reply

error: Content is protected !!