“त्यांच्या” मदतीसाठी दत्ता सामंत धावले ; भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून मदतीचा हात…

घराचे छप्पर कोसळलेल्या बांदिवडे येथील मांजरेकर याना भाजपकडून आर्थिक मदत!

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील बांदीवडे बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर गुरुवारी संध्याकाळी कोसळून मोठे नुकसान झाले होते. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अचानक कोसळलेल्या संकटामुळे मंगल मांजरेकर कुटुंब खचून गेले होते. अशा या कठीण प्रसंगात पुन्हा छप्पर कसे उभारावे या विवंचनेत हे संपूर्ण कुटुंब होते. याची माहिती मिळताच भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी रविवारी बांदिवडे येथे भेट देत या कुटुंबाला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून या कठीण प्रसंगात मांजरेकर याना थोडासा दिलासा मिळावा यासाठी सदर मदत देण्यात आली असल्याचे यावेळी श्री. सामंत म्हणाले.

यावेळी उपस्थित सरपंच आशु मयेकर यांच्या जवळ घरकुल योजनेमधून मांजरेकर याना लाभ मिळवून द्यावा अशी सामंत यांनी सूचना केली. गोरगरीब ग्रामस्थांच्या मदतीसाठी दत्ता सामंत नेहमीच धावून जात असतात. दत्ता सामंत यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर आमच्या कुटुंबासाठी धावून आला तसेच भारतीय जनता पक्ष आणि दत्ता सामंत यांचे कठीण प्रसंगात दिलेली साथ आम्ही कधीही विसरणार नाही. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून दत्ता सामंत यांचा प्रत्यय आल्याची भावना यावेळी मंगल मांजरेकर यांनी व्यक्त केली. घराचे छप्पर कोसळून नुकसान झाल्या नंतर मंगल मांजरेकर याना मदत मिळावी यासाठी माजी उपसभापती छोटू ठाकूर, लक्ष्मी पेडणेकर तसेच भाजप पदाधिकारी यानी भाजप नेते दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते. यावेळी माजी उपसभापती छोटू ठाकूर, दीपक पाटकर, मालवण तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, प्रफुल्ल प्रभू, सतीश बांदिवडेकर, आनंद परब, ललित चव्हाण, अशोक बागवे, सुनील घाडी, जितेंद्र परब, तात्या हिंदळेकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, सचिन हडकर, अजय पडवळ, आबा आईर, संतोष गावकर, बबन मुणगेकर, जुबेर सय्यद, आशिष चेंदवनकर, पुरुषोत्तम शिंगरे, शाहुलखन बांदिवडेकर तसेच भाजप पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!