मालवण बंदर जेटी वरील प्रवासी टर्मिनलला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या…

जेष्ठ पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांची मागणी ; लवकरच मेरिटाईमच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार

मालवण : महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे प्रवासी टर्मिनल उभारण्यात आले आहे. या टर्मिनलचे लवकरच उदघाटन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील या दिमाखदार टर्मिनलला ‘छत्रपती शिवाजी महाराज मालवण प्रवासी टर्मिनल’ असे नाव देण्यात यावे. अशी आग्रही मागणी मालवण येथील जेष्ठ पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी केली आहे. लवकरच याबाबत
मेरिटाईम बोर्ड वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन भूमिका मांडणार असल्याचे तोडणकर यांनी प्रसिद्धीपत्राच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

मालवणचे पर्यटन केंद्रस्थान किल्ले सिंधुदुर्ग हे आहे. लाखो पर्यटक दरवर्षी किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी भेट देतात. या नव्या टर्मिनल जेटी वरूनच पर्यटकांची ये जा सुरु राहणार आहे. पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण असलेल्या मालवण प्रवासी टर्मिनलला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. ही आमची आग्रही मागणी आहे. मेरीटाईम बोर्डने याबाबत लवकर निर्णय जाहीर करावा. अन्यथा १ डिसेंबर रोजी प्रसंगी समुद्रात उपोषण करण्याची भूमिका घेतली जाईल. असे तोडणकर यांनी सूचित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपण सर्वजण मुक्तपणे जीवन जगत आहोत. त्यांच्या ऐतिहासिक ठेव्यामुळे पर्यटन वाढत आहे. या सर्वांचा विचार करता. पर्यटन नगरी मालवण येथील प्रवासी टर्मिनलला ‘छत्रपती शिवाजी महाराज मालवण प्रवासी टर्मिनल नाव द्यावे अशी भूमिका दामोदर तोडणकर यांनी स्पष्ट केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!