प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज ९ ऑक्टोबरला कुडाळात !
भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित “विशाल पर्व” कार्यक्रमांचा होणार शुभारंभ ; माजी खा. निलेश राणेंची उपस्थिती
९ ते १५ ऑक्टोबर पर्यंत भरगच्च कार्यक्रम ; वाढदिवसाच्या मुख्य सोहळ्यात सुप्रसिद्ध गायक जुबीन नॉटीयला यांचा लाईव्ह कॉन्सर्ट
कुडाळ | कुणाल मांजरेकर
भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते तथा युवा उदयोजक, सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांचा वाढदिवस येत्या १५ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमानी कार्यक्रमानी साजरा होत आहे. या कार्यक्रमांचा शुभारंभ ९ ऑक्टोबर रोजी कुडाळ मधील वासुदेवानंद सरस्वती ट्रेड सेंटर मध्ये प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने होणार आहे. या शुभारंभाला भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर १५ ऑक्टोबरला सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर सुप्रसिद्ध गायक जुबीन नॉटीयाल यांचा बहारदार संगीताचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी कुडाळ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहावर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दादा साईल म्हणाले, विशाल परब यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमानी साजरा होत असतो. यावर्षी यानिमित्ताने “विशाल सप्ताह साजरा करण्यात येणार असून ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर याकालावधीत तब्बल एक आठवडा संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ऑक्टोबरला कुडाळ येथील श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे संध्याकाळी ५ वाजता विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या “विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याचा शुभारंभ माजी खासदार आणि भाजपाचे कुडाळ मालवण प्रभारी निलेश राणे यांच्याहस्ते होणार आहे. यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात आणि हजारो वारकरी, श्रोत्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ६ ते ९ अशा वेळेत होणार आहे.
११ ऑक्टोबरला होममिनिस्टर स्पर्धेचे दोडामार्ग येथे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन स्त्री शक्तीचा मान सन्मान केला आहे. तसेच महिलांचे आज राजकारणात, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान असून त्यांचा मोलाचा वाटा आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा असलेल्या दोडामार्ग येथे भव्य दिव्य अशा “होम मिनिस्टर” या महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर १३ ऑक्टोबरला वेंगुर्ले येथील कॅम्प स्टेडियम येथे “विशाल दांडिया” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय भव्य दांडिया स्पर्धेमध्ये नामांकित संघ भाग घेऊन सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच भव्य दिव्य अशी दांडिया स्पर्धा असून या स्पर्धेला हजारो दर्शकांची उपस्थिती असणार आहे. ही स्पर्धा संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे.
१५ ऑक्टोबरला सुप्रसिद्ध गायक जुबीन नॉटीयला सावंतवाडीनगरीत दाखल होणार आहेत. विशाल परब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असताना यानिमित्ताने सावंतवाडी जिमखाना मैदानावर जगप्रसिद्ध गायक जुबीन नॉटीयला याचा LIVE CONCERT हा जगातील नंबर वनचा लाईव्ह गाण्याचा शो होणार आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्र, गोव्यात हा शो होत आहे. सुमधूर संगीताने जगातील तरुण-तरुणींना भुरळ घालणाऱ्या ज्युबीन नॉटीयलाला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळणार आहे. या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल व संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.