Sindhudurg Update : ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकूम… ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकूम…

कुडाळमध्ये काही वेळातच रंगणार कोकणातील सर्वात मोठ्या दहीहंडीचा थरार…

भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून आयोजन ; मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी

कुडाळ | कुणाल मांजरेकर

भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी कुडाळ नवीन एसटी स्टँडच्या मैदानावर कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव दिमाखात रंगणार आहे. या दहीहंडी उत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यातील पथके दाखल होणार आहेत. यानिमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांची मांदियाळी अनुभवता येणार आहे. काही वेळातच हा कार्यक्रम होत असून याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दहीहंडी उत्सवातून सिंधुदुर्गातील जनतेला दहीहंडीसारख्या साहसी खेळाचा थरार पाहता येणार आहे. या दहीहंडीत विजेत्या संघाला ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या दहीहंडी उत्सवात प्रमुख आकर्षण सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, सिनेअभिनेत्री मानसी नाईक, प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम, प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे यांची उपस्थिती राहणार आहे. या व्यतिरिक्त प्रसिद्ध बॉलीवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक सचिन गुप्ता आणि त्यांचे सहकलाकार यांचा लाईव्ह संगीत शो आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रिवा अरोरा सुद्धा कुडाळमध्ये दहीहंडी उत्सवाला उपस्थित असतील.

लेझर शो आकर्षण ठरणार

शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून कुडाळ नवीन एसटी स्टँडच्या मैदानावर हा उत्सव रंगणार असून यामध्ये लेझर शो मुख्य आकर्षण असेल.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!