घुमडाई मंदिरात “श्रावणधारा” निमित्त उद्यापासून निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने आयोजन ; पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते होणार उदघाटन
मालवण | कुणाल मांजरेकर
श्रावण मास निमित्ताने घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिर येथे ८ ते ११ सप्टेंबर रोजी उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित गुरुवर्य कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मरणार्थ निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाट्न शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे.
घुमडाई मंदिरात श्रावण मासानिमित श्रावणधारा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित गुरुवर्य कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मरणार्थ निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा ८ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी घुमडाई मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या मंडळास ११,१११ व सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक ७,७७७ सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक ५,५५५ सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र उत्तेजनार्थ प्रथम ३,३३३ सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ द्वितीय २,२२२ सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र कै. रत्नाकर हरी बिरमोळे समारणार्थ वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट कोरस, तालरक्षक, उत्कृष्ट गायक यांना प्रत्येकी १,१११ व सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेची सर्व बक्षिसे उद्योजक दत्ता सामंत यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहेत.
पारितोषिके वितरण व संयुक्त दशावतार
मंगळवार १२ सप्टेंबर रोजी मंदिरात धार्मिक कार्यक्रम लघुरुद्र, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता भजन स्पर्धा पारितोषिक सोहळा, सायंकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत दशावतार कलाकार यांचा संयुक्त दशावतार “राजा रुक्मांगत” सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत, सचिव भाऊ सामंत व सर्व सहकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.